पावसाचा फटका अंत्ययात्रेला देखील बसल्याचं दिसून येत आहे. गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ शीळ गावातील ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीच्या परिसरात सखोल भागात पाणी साचल्यामुळे, मोठी अडचण होत आहे.