कल्याणजवळच्या मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झालीये. आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झाला. या ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आलाय.