गडचिरोली जिल्ह्यातील गुंडेनूर नाला ओलांडताना काम सुरू असल्यामुळे जीव मुठीत धरून कच्च्या मार्गावरून प्रवास करावा लागतो आहे. मागील चार वर्षापासून भामरागड-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. गुंडेनूर नाल्यावर नेहमीच पावसाळ्यात वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.