गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 350 वर्षांची परंपरा असलेला हजरत वली हैदरशाह बाबांचा उर्स महोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यात तीन राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. समस्त नागरिकांना सुख-शांती व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करून आमदार धर्मराव आत्राम यांनी जत्रेचे उद्घाटन केले.