गडचिरोली : कुरखेडा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी थेट नगर पंचायत कार्यालयात गावातील कचरा आणून टाकत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे नगर पंचायत परिसरात एकच गोंधळ उडाला असून शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.