गडचिरोलीत माओवाद्यांच्या गड असलेल्या अबूजमाडच्या बिनागुंडा येथे गडचिरोली पोलिसांकडून नक्षलविरोधी ऑपरेशन व जनजागरण मेळाव्याचे आयोजण करण्यात आले आहे. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, DIG अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल आज अबूजमाडच्या घनघाट जंगलात ऑपरेशनची पाहणी साठी दाखल झाले होते.