गडचिरोली जिल्ह्यात सिरोंच्या छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करून धान खरेदीची मुदतवाढ देण्यात यावी ही मागणी करत नारेबाजी केली. जवळपास तीन तासांपासून हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यासाठी बंद केलाय. गडचिरोली जिल्ह्यातील हा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर शेतकरी आंदोलन करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाला आहे. धान विक्री व खरेदीची शेवटची तारीख 30 जुलै असल्यामुळे मुदतवाळ शेतकऱ्यांना न देण्यात आल्याने हा आंदोलना शेतकरी आज सकाळपासून करीत आहेत.