गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलंगणातून आलेल्या वानरांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. ही माकडे सकाळ-संध्याकाळ घरांमध्ये घुसून खाद्यपदार्थ आणि भांडी घेऊन जात आहेत, तसेच नागरिकांवर हल्लेही करत आहेत. या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून, वन विभागही चिंतातूर झाला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.