राज्यात पावसाचे धुमशान सुरुच असून गडचिरोलीत सती नदीला मोठा पुर आला आहे. या पुरात एका बाईकस्वाराला बुडताना पाहून ग्रामस्थांनी त्याला वाचवल्याची घटना घडली आहे. अजय रामटेके हा ४० वर्षांचा इसम बाईकवरुन जात असताना कुरखेडा येथे सती नदीच्या पाण्यात वाहून जाणार इतक्यात ग्रामस्थांनी त्याला वाचवल्याचे घटना घडली आहे.