सांगली शहरात मुस्लीम समाजाकडून एक अनोखी परंपरा जपली जात आहे. सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लीम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ही परंपरा सलग 25 वर्षांपासून सुरु आहे.