यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडली असून, गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्तीमध्ये दरवाढ झाली आहे.