नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. 4 हजारपेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार होणार आहेत. तर, पंधराशेपेक्षा अधिक मजुरांच्या हाताने वेगवेगळ्या आणि सुंदर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. पेन नंतर सर्व प्रकारच्या सुंदर गणेश मूर्ती नंदुरबारच्या कारखान्यात तयार होत असून महाराष्ट्रसह गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील गणेश मंडळ देखील गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी येत आहेत