सोलापुरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरातील श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आलं. सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट येथे बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख, नात क्रीशा आणि नातू विधार्थ आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.