आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, पाणीटंचाई आणि पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)च्या दरवाढीचा फटका आता वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकारांना बसू लागला आहे. मूर्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने मूर्ती बनवण्याचा खर्च वाढला आहे तसेच मूर्ती बनवण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. विशेषतः पीओपीच्या एका बॅगेसाठी मूर्तिकारांना पूर्वीपेक्षा सुमारे ५० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. याशिवाय वाहतूक खर्च आणि टँकर द्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या समस्येमुळेही उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.