गणेश नाईक यांनी म्हटले आहे की, पक्षाने परवानगी दिली असती तर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर होऊ शकला असता. पक्षाच्या आदेशामुळे कार्यकर्त्यांनी समाधान मानले, तरी ते आनंदी नाहीत. नाईक यांनी "युद्धात जिंकलो, तहात हरलो" असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.