गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या टोळीने एका घराची दाराची कडी कोंडा तोडून घरातून दागिने, रोख व साहित्य असा एकूण 1 लाख 86 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे.