परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील चिंच टाकळीला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा वेढा पडला आहे. गावातील नागरिक अच्युतराव मोरे यांच्यावर नांदेडमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे त्यांचा मृतदेह थर्माकोलच्या होडीवर ठेवत ओढा पार करावा लागला.