नाताळ आणि सरत्या वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये रत्नागिरी गणपतीपुळे पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेले आहे. देशभरातून हजारो पर्यटक कोकणात दाखल झाल्याने एमटीडीसी रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि लॉजेस पूर्णपणे भरले आहेत. 'रूम शिल्लक नाही' असे बोर्ड सगळीकडे दिसत असून, कोकणातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.