"जिद्द आणि चिकाटी असेल तर दगड-धोंड्यांतूनही सोनं पिकवता येतं," हे आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका आदर्श मुख्याध्यापकाने सिद्ध करून दाखवले आहे. एकनाथ लाड असे या प्रयोगशील शेतकरी आणि शिक्षकाचे नाव असून, त्यांनी चिखलीच्या डोंगरावरील मुरमाड जमिनीवर केशर आंब्याची नंदनवन फुलवले आहे.