गृहिणींसाठी मोठी बातमी आहे. आता जेवणाला देण्यात येणारी फोडणी महाग होणार आहे. कारण लसूण ३० ते ४० रूपयांनी महागला आहे. लसणाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे. वाशीमधील एपीएमसी बाजारात लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दरात वाढ झाली आहे.