गेल्या पंधरा दिवसांत लसणाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात काही दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो मिळणारा चांगल्या दर्जाचा लसूण आता थेट १६० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. बाजारात लसणाची आवक घटली असताना मागणीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाली आहे.