नंदुरबार बाजार समितीत लसणाची चांगलीच आवक होत असल्यामुळे लसणाचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहे, मागील महिन्यात ३०० रुपये किलो प्रमाणे विक्री होणार लसूण आता ५० रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे, बाजारपेठेत लसणाचे दर घसरल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी बाजारपेठेत न जाता स्वतः लसूण विक्री करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे वाचत आहे तर ग्राहकांना देखील चांगला फायदा होत असल्यामुळे अशा शेतकऱ्यांकडून ग्राहक मोठ्या प्रमाणात लसूण खरेदी करीत आहेत. कमी दरात लसूण मिळत असल्याने अनेक गृहिणी लसूण खरेदी करून साठवणूक करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत.