व्यवसायिक गॅस सिलेंडरांचा तुटवडा जाणवत असल्याने धुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिक देखील मोठ्या चिंतेत सापडले आहेत.गॅस पुरवठा होत नसल्याने हॉटेल सुरु ठेवणे शक्य नाही. सायंकाळ नंतर गॅस सिलेंडर उपलब्ध झाले नाही तर हॉटेल बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याची खंत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.