आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस टंचाईच्या रूपाने अनेक ठिकाणी जाणवत आहे. महाराष्ट्रातील काही धार्मिक स्थळांनाही याचा फटका बसत आहे. साताऱ्यातील सज्जनगडावर मात्र भक्तांच्या भोजन प्रसाद सेवेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे...दररोज हजारो भाविक सज्जनगडावर दर्शनासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. गॅस टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले तर द्रोण मध्ये काट कसर करून काही प्रमाणात प्रसाद दिला जाईल पण महाप्रसादाचा खंड पडू दिला जाणार नसल्याचे यावेळी संस्थांच्या वतीने सांगण्यात आले.