इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना चंद्रपूर शहरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत. घरपोच गॅस पुरवठा सुरू असल्याच्या चर्चा असतानाही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे