मुंबईच्या चेंबुरमधील वाशीनाका ते माहुल दरम्यान गॅसने भरलेला टँकर पलटल्याची घटना समोर आली आहे. गॅसने भरलेला हा टँकर स्लिप झाल्याचं म्हटलं जात आहे. वाशीनाका-माहुल दरम्यान अनधिकृतपणे गाड्यांची पार्किंग होते. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर पुरेशी जागा नसल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.