पुणे येथील विश्रांती नगर सिंहगड रोड येथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गवा पुणे वनविभागाने आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बचाव केला होता. वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यास कोणत्याही प्रकारची जखम अथवा मार नसल्याची खात्री करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत तंदुरुस्त आढळल्यानंतर गव्याला अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बोर व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. गवा प्राणी हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गपर्यटकासाठी नवीन आकर्षण ठरणार आहे.