नागपंचमी आणि श्रीयाळषष्ठी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गौराईची स्थापना करण्यात आली. हत्तीवर बसलेली गौराई ही माहेरवासिनीचे प्रतीक मानले जाते. या गौराईची दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विठ्ठल मंदिरात मंदिरात प्रतिष्ठापना होते आणि त्यानंतर लगेचच पंढरपूर शहरात नगरप्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक निघून चंद्रभागेत विसर्जन होते. परंपरागत असणाऱ्या गौराईच्या मूर्ती समोर अनेक महिला भगिनी या फेर धरतात फुगड्या खेळतात आणि महिला परंपरागत पंचमीचा सण उत्साहात साजरा करतात.