छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीनमध्ये गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गर्दी झाल्यामुळे लोक आजूबाजूच्या इमारतीवर धोकादायक पद्धतीने उभे राहून हा कार्यक्रम पाहत होते. विशेष म्हणजे एका नेत्याने भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. आगामी दोन-तीन महिन्यांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने आता वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य जोमाने कामाला लागले आहेत. काल संध्याकाळी बिडकीनमध्ये गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली काही. गर्दीत रेटारेटी झाली पण पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र लोक धोकादायक पद्धतीने आजूबाजूच्या इमारतीवर झाडावर बसून हा कार्यक्रम पाहत होते.