चंद्रपूरमध्ये आज काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील या मैदानात उतरल्या होत्या. गौतमी पाटील यांनी आज बाबूपेठ ते गांधी चौक असा पाच किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी मतदारांना अभिवादन करत त्यांनी काँग्रेससाठी मते मागितली.