सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील घोणसरी येथे एक मादी बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात आले आणि पशुवैद्यकीय तपासणीत तो निरोगी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मादी बिबट्याला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.