चंद्रपूर जिल्ह्यातील पुढे ढकलण्यात आलेली घुग्गुस नगर परिषद निवडणूक उद्या होत आहे. मतदान पथके विविध केंद्रांवर रवाना झाली असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या शहरात स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. २२ नगरसेवक जागा व एका नगराध्यक्षपदासाठी ३२,८०० मतदार आपला हक्क बजावणार आहेत.