गिरीश महाजन यांनी आंबेडकर जयंती संदर्भात झालेल्या वादग्रस्त विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली. एका अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. ४० वर्षांपासून आपण आंबेडकर जयंती मिरवणुकीत सक्रिय सहभागी होत असल्याचे सांगत, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही राजीनाम्याची मागणी कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.