काल नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वाद तापला आहे. याप्रकरणी अधिकारी माधवी जाधव यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. समाज माध्यमांवर महाजनांविरोधात लाट आली आहे. तर अनेक नेत्यांनी त्यावरून महाजन यांना लक्ष्य केले आहे. याप्रकरणी आवाज उठवणाऱ्या माधवी जाधव यांनी मोठी मागणी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला होता. पण आज बाबासाहेबांच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा द्यावा लागत आहे. ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याने मला ताब्यात घेऊन गाडीत आणलेले त्या महिलेला देखील मी सांगितले तुझ्या अंगातली वर्दी बाबासाहेबांमुळेच आहे. गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा केलेला अपमान भरून निघण्यासारखा नाही. पाप संविधानाच्या मार्गाने ॲट्रॉसिटी दाखल होईल तेव्हाच भरून निघेल असे माधवी जाधव म्हणाल्या.