राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील रामपूर येथील सिद्धगड भवानी देवीच्या यात्रेत कुटुंबीयांसमवेत आनंदाचे क्षण घालवले. नवरात्रोत्सवानिमित्त गिरीश महाजन यांनी पत्नी, मुली आणि नातवंडांसह सिद्धगड भवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी यात्रेतील विविध स्टॉल्सना भेट देत नातवंडांचा खेळणी खरेदी करण्याचा हट्टही पुरवला.