दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र बाप्पाला निरोप देताना अनेकांना असह्य वेदना होत असतात. अशातच बाप्पाला निरोप देत असताना एक चिमुकली धाय मोकलून रडत असल्याचं दिसून आले आहे. अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील श्रीजा थोरात हिचा हा व्हिडिओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.