जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले गिरणा धरण सलग तिसऱ्यांदा १०० टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल आणि धरणगाव या तालुक्यांमधील ५२ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.