भंडारा जिल्ह्यातील जांब कांद्री वनपरिक्षेत्रातील हरदोली बीट अंतर्गत धुसाळा येथे विहिरीत पडलेल्या जखमी वानराला वनविभागाने सुरक्षित जीवदान दिले. शेतकरी कमलेश वडीचार यांच्या विहिरीत वानर पडल्याची माहिती मिळताच बीटरक्षक वर्षा दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वनमजूर मदन हिरापुरे, देवानंद पाटील व चालक उईके यांच्या मदतीने वानराला शिताफीने बाहेर काढण्यात आले. जखमी वानरावर खमारी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.