बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक अजब आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. लिंबागणेश येथील एका हॉटेलच्या परिसरात चरत फिरत असलेल्या शेळ्यांना कारमधून आलेल्या चोरट्यांनी भाकरी टाकून जवळ आकर्षित केले आणि क्षणात तीन शेळ्या चारचाकीत कोंबून पसार झाले. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.