दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी मातेचा माघ मास जन्मोत्सव सोमवारपासून सुरू होत आहे. बारा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील. गंगा गोदावरी पुरोहित संघाद्वारे आयोजित या उत्सवाचे मुख्य आकर्षण २८ रोजी दुपारी १२ वाजता होणारा जन्म सोहळा असेल.