जळगावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला. सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सराफा दुकानात गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 24 हजार 500 तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 60 हजार रुपयांवर आले आहेतय. त्यात जळगावात सोन्यात साडेचार हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली.