कमी कॅरेटच्या सोन्याचे दर त्याच्या टक्केवारीवर आधारित असतात. जर तुम्हाला फक्त गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल, तर कॉइन्स किंवा कच्च्या सोन्याला प्राधान्य द्या. दागिने भावनिकतेने जोडलेले असल्याने, आर्थिक अडचणीत त्यांची विक्री करणे कठीण होऊ शकते. गुंतवणुकीचे सोने नेहमीच चांगल्या-वाईट वेळेसाठी उपयुक्त ठरते.