जागतिक संकटामुळे शेअर बाजारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका विक्रमी सोन्याची खरेदी करत आहेत. ऑगस्टमध्ये, केंद्रीय बँकांनी १५ टन सोन्याची खरेदी केली, ज्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.