सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झालेली असतानाच चांदीही नवीन विक्रम करत आहे. अलीकडील अहवालानुसार चांदी भविष्यात सोन्यालाही मागे टाकू शकते. सध्या १,६०,००० रुपयांच्या आसपास व्यापार करत असलेली चांदी २०११ मधील ७०,००० रुपयांवरून दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर सोन्याने ११-१२ पट वाढ नोंदवली आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.