सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली आहे. २४ तासांत सोन्याचे दर १३,००० रुपयांनी तर चांदीचे दर २२,००० रुपयांनी वाढले. जीएसटीसह एक तोळा सोने १,८२,३१० रुपयांवर पोहोचले असून, एक किलो चांदीचा दर ४,०१,७०० रुपये झाला आहे.