गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चार वक्रद्वार प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडले आहेत. या गेटमधून सध्या 86.36 क्युमेक म्हणजेच 3 हजार 49 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.