गोंदियात थंडीचा जोर पुन्हा वाढला असून पारा 8.2°C पर्यंत घसरला आहे. मध्यंतरी तापमान 15 अंशांवर पोहोचले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. यामुळे नागरिकांना सकाळी-सायंकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले असून, थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. यंदाचे हे सर्वात कमी तापमान आहे.