गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात धोबतोला गावातील बिअर बारविरोधात महिलांनी सलग अकराव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर बार असल्याने महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. तात्काळ बार बंद करण्याची मागणी करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.