गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून रानटी हत्तींचा मुक्काम आहे. या हत्तींच्या कळपाने वडसा मार्गावर भर रस्त्यात वाहनधारकांना दर्शन दिले. अचानक हत्ती समोर आल्याने प्रवाशांची आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.