आपल्या गोंदिया जिल्ह्यात सापांच्या एकूण १८ प्रजाती आढळतात, ज्यामध्ये निसर्गाचा एक अद्भुत समतोल दिसून येतो. गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या १८ प्रजातींपैकी, फक्त ५ प्रजाती विषारी आहेत, २ निम्नविषारी आहेत, तर उर्वरित ११ पूर्णपणे बिनविषारी आहेत. यातील चार अत्यंत विषारी प्रजातींमध्ये मण्यार, घोणस (परड), नाग, आणि फुरसे यांचा समावेश होतो.